Maharashtra State New District And Taluka Formation : भविष्यात महाराष्ट्राचा नकाशा बदलण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात नव्या 81 तालुके आणि 20 जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्ताबाबत भाष्य केले आहे. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातीलनवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार असल्याच्या चर्चा सुरु आहे. नविन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मीतीमुळे प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला चालना मिळणार आहे.

महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आणि 385 तालुके आहेत, तसेच मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही. हे जिल्हे 6 महसूल विभागांमध्ये विभागले आहेत. राज्यात 81 तालुके आणि सुमारे 20 जिल्हे निर्मितीचा प्रस्ताव आहे, जनगणना झाल्यावर भौगोलिक स्थिती पाहून निर्णय घेऊ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची चंद्रपुरात माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या चंद्रपूर दौऱ्यात राज्यातील जिल्हे आणि तालुका निर्मिती बाबत मोठे विधान केले आहे. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्र परिषदेत त्यांनी 81 तालुके आणि सुमारे 20 जिल्ह्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे असल्याचे सांगत जनगणना झाल्यावर , जागांची पुनर्रचना लक्षात घेतल्यावर या संबंधात भौगोलिक परिस्थिती पाहून आवश्यक असेल त्या ठिकाणी निर्णय घेऊ असे सांगितले.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी राज्यात 26 जिल्हे होते. आतापर्यंत 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. 1 ऑगस्ट 2014 रोजी पालघर जिल्हा ठाण्यातून स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. याच प्रमाणे आता नाशिकमधून मालेगाव अहमदनगरमधून शिर्डी, पुण्यातून बारामती, ठाण्यातून मीरा-भाईंदर आणि साताऱ्यातून कराड असे नविन जिल्हे निर्माण करणे प्रस्तावित आहे. तालुका निर्मितीचा निर्णय झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर आराखडा तयार केला जातो. या आराखड्यावर लोकांकडून हरकती आणि सूचना मागवल्या जातात. सर्व हरकती आणि सूचनांचा विचार करून जिल्हाधिकारी आपला अंतिम अहवाल शासनाकडे पाठवतात, त्यानंतर शासन अंतिम निर्णय घेतला जातो.
FAQ
1 महाराष्ट्रातील नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीबाबत प्रस्ताव काय आहे?
महाराष्ट्र सरकारकडे सुमारे २० नवीन जिल्ह्यांची आणि ८१ तालुक्यांची निर्मितीचा प्रस्ताव आहे. हे प्रशासकीय सोयी आणि स्थानिक विकासासाठी प्रस्तावित आहे. मात्र, जनगणना झाल्यानंतर भौगोलिक स्थिती आणि जागांची पुनर्रचना पाहून निर्णय घेतला जाईल.
2 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत काय सांगितले?
चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर दौऱ्यातील पत्र परिषदेत हा प्रस्ताव असल्याचे सांगितले. जनगणना झाल्यानंतर भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी निर्णय घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
3 महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आणि तालुके आहेत?
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आणि ३५८ तालुके आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही. हे जिल्हे ६ महसूल विभागांमध्ये विभागले आहेत (कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर). Maharashtra State New District And Taluka Formation