५ लाख अपात्र, २६ लाख ब्लॉक
येथे पहा यादी
५ लाख लाभार्थींना थेट लाभ बंद होण्याची कारणे Ladki Bahin Installment Rejected
शासनाच्या पडताळणीमध्ये खालील महत्त्वाच्या निकषांमुळे सुमारे ५ लाख महिलांना ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ थेट बंद केला गेला आहे:
- संजय गांधी निराधार योजनेचा लाभ: ज्या महिलांनी पूर्वी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतला आहे, अशा २ लाख ३० हजारपेक्षा अधिक महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
- वय मर्यादा ओलांडणाऱ्या महिला: ज्या महिलांचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा सुमारे १,१०,००० महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे.
- कुटुंबात चारचाकी वाहनधारक: ज्यांच्या कुटुंबामध्ये चारचाकी गाडी आहे, अशा अनेक महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. (यामध्ये नमशक्ती योजना लाभार्थींचाही समावेश आहे.)
- स्वतः सेवानिवृत्त महिला: सुमारे १,६०,००० सेवानिवृत्त महिलांची संख्या देखील यात लक्षणीय आहे.
२६.३ लाख खाती तात्पुरती निलंबित (Temporarily Blocked)
जून २०२५ पासून, २६.३ लाख लाभार्थींचे खाते तात्पुरते ब्लॉक करण्यात आले आहेत, कारण त्यांच्या पात्रतेत शासनाला शंका आहे.
- जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांना त्यांची पडताळणी (Verification) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- जो खरा लाभार्थी असेल, त्यांना पडताळणीनंतर पुन्हा योजनेचा लाभ मिळेल.
महिलांना मिळणार फक्त ५०० रुपयात पिठाची गिरणी; “या” 20 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू,असा करा अर्ज flour mill subsidy
योजनेचा गैरवापर आणि वसुलीची कारवाई
योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर शासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे:
- पुरुष लाभार्थी: योजनेचा गैरफायदा घेत १४,२९८ पुरुषांनी लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. आता त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
- सरकारी कर्मचारी:
- २,६५२ राज्य सरकारी महिला कर्मचारी आणि १,१८३ जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी चुकीने लाभ घेतल्याचा तपास झाला आहे.
- यांच्याविरोधात वसुली आणि अनुशासनात्मक कारवाई करण्याची तयारी आहे.
महिलांना मिळणार फक्त ५०० रुपयात पिठाची गिरणी; “या” 20 जिल्ह्यासाठी अर्ज सुरू,असा करा अर्ज flour mill subsidy
या महिलांचा अर्ज अपात्र ठरू शकतो
तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असल्यास आणि खालील अटी पूर्ण करत नसल्यास, तुमचा अर्ज अपात्र ठरू शकतो:
- उत्पन्न मर्यादा: तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाख पेक्षा जास्त असल्यास.
- सरकारी नोकरी: कुटुंबातील कोणताही सदस्य (पती, वडील किंवा मुलगा) सरकारी नोकरीत असल्यास.
- आयकर भरणारे कुटुंब: कुटुंबातील कोणीही आयकर (Income Tax) भरत असल्यास.
- इतर योजनांचा लाभ: जर तुम्ही आधीपासूनच दुसऱ्या कोणत्याही सरकारी योजनेतून दरमहा मोठी रक्कम (उदा. ₹१,००० पेक्षा जास्त पेन्शन) घेत असाल.
- वाहनांची मालकी: तुमच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन किंवा ट्रॅक्टर असल्यास.
- वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या महिलेचे वय २१ वर्षांपेक्षा कमी किंवा ६० वर्षांपेक्षा जास्त असल्यास.