शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मानचा 7 वा हप्ता “या” तारखेला मिळणार? “या” शेतकऱ्यांना मिळणार 4000 हजार? Namo Shetkari Instalment

Namo Shetkari Instalment : शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. केंद्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली.

“या” तारखेला मिळणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

“या” शेतकऱ्यांना मिळणार 4000 हजार?

योजनेची अंमलबजावणी

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेशी जोडलेली आहे. ज्यांना पीएम किसानचे लाभ मिळतात, त्यांनाच राज्य सरकारकडून या योजनेचे पैसे दिले जातात. त्यामुळे पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः 9 ते 10 दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरीचा हप्ता जमा होतो. केंद्रीय कृषी विभागाकडून राज्याच्या कृषी विभागाला लाभार्थ्यांची यादी पाठवली जाते आणि त्यानुसार राज्य सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करते.

आत्तापर्यंतचे हप्ते

सातव्या हप्त्याची तारीख

अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता आहे. या हप्त्याचा लाभ सुमारे 96 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळणार असून, यासाठी 1900 कोटी रुपये निधीची तरतूद आवश्यक आहे.Namo Shetkari Instalment

शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि चिंता

सध्याच्या परिस्थितीत अनेक शेतकरी अजूनही मागील हप्त्याची रक्कम वेळेवर न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. पावसामुळे आणि हवामानातील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. अशा वेळी हंगामी कामांसाठी लागणाऱ्या बियाणे, खते आणि मजुरीसाठी या योजनेतील रक्कम महत्वाची ठरते. त्यामुळे सातवा हप्ता कधी जमा होणार याकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत.

Leave a Comment